येरवड्यामध्ये प्रौढाचा खून
By Admin | Updated: June 9, 2014 23:34 IST2014-06-09T23:05:28+5:302014-06-09T23:34:21+5:30
कठीण वस्तूने मारहाण करुन ४० वर्षीय प्रौढाचा खून करण्यात आल्याची घटना येरवड्यामध्ये घडली.

येरवड्यामध्ये प्रौढाचा खून
पुणे : कठीण वस्तूने मारहाण करुन ४० वर्षीय प्रौढाचा खून करण्यात आल्याची घटना येरवड्यामध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिंबक देवराम पाटील (वय ४०, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या शरिरावर ठिकठिकाणी मारहाण करुन तसेच कठीण वस्तूने मारहाण करुन खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवारी आढळून आला होता. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालामधून पाटील यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.