राजगुरूनगरला प्रौढाचा खून
By Admin | Updated: November 14, 2016 02:39 IST2016-11-14T02:39:36+5:302016-11-14T02:39:36+5:30
राजगुरूनगरला प्रौढाचा खून

राजगुरूनगरला प्रौढाचा खून
राजगुरुनगर : उसने दिलेले पैसे सातत्याने मागणी करतात म्हणून आणि आईशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मुलांनी आईच्या मदतीने एका प्रौढाचा खून करून मृतदेह गुळाणी ( ता. खेड) गावाच्या घाटात टाकल्याची घटना काल रात्री घडली.
या गुन्ह्यात जिजाभाऊ पांडुरंग वरुडे ( वय -५५, रा. वडगाव पाटोळे, ता. खेड, जि. पुणे ) यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात मीनाबाई चंद्रकांत वरुडे, प्रवीण चंद्रकांत वरुडे, प्रमोद चंद्रकांत वरुडे ( सर्व रा. वडगाव पाटोळे, ता. खेड, जि. पुणे ) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जिजाभाऊ यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर १ वर्षापासून त्यांचे आरोपी मीनाबाई वरुडे हिच्याबरोबर अनैतिक संबंध होते. हे तिच्या कुटुंबीयांना माहित होते. त्यामुळे त्यांचा जिजाभाऊंवर राग होता. तसेच आरोपी मीनाबाई आणि तिची दोन मुले प्रवीण आणि प्रमोद यांनी जिजाभाऊ यांच्याकडून वेळोवेळी ४ ते ५ लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे जिजाभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींकडे मागितले असता त्यांनी जिजाभाऊ यांना मारून टाकण्याची धमकी दिली होती.
मात्र, भीतीने त्यांनी याची तक्रार दिली नाही. शेवटी आरोपींनी काल रात्री साडेपाच ते आज सकाळी १२ वाजण्याच्या दरम्यान जिजाभाऊ यांच्या गळ्यावर व पोटावर धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून केला. मृतदेह सुळकी नावाच्या वनखात्याच्या जंगलात टाकला. (वार्ताहर)