अकरावीच्या ८२ टक्के जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:38+5:302021-02-05T05:01:38+5:30

पुणे : अकरावी प्रवेशासाठी राबविलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या ५ लाख ५८ हजार ८३० जागांपैकी ...

Admission of students in 82% of the eleven seats | अकरावीच्या ८२ टक्के जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश

अकरावीच्या ८२ टक्के जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश

पुणे : अकरावी प्रवेशासाठी राबविलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या ५ लाख ५८ हजार ८३० जागांपैकी ३ लाख ६९ हजार ८७१ जागांवर (८२ टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात ८०.८१ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून ३४.४१ टक्के जागा रिक्त आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अमरावती, औरंगाबाद, मुंंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्याचप्रमाणे रिक्त जागांवर प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या फेऱ्यांअंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अकरावीच्या जागांसाठी ४ लाख ४६ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला. त्यात मुंबईच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक २ लाख ५८ हजार ८५५ एवढी होती. तर पुण्यातील ८६ हजार ९१० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास उशीर झाला. त्याचप्रमाणे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे सुरू असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबविली. तसेच सुमारे दीड महिन्यांनंतर मराठा आरक्षणाशिवाय प्रवेश प्रक्रिया राबविली. परिणामी प्रवेशास विलंब झाला. पुण्यातील अकरावी प्रवेशाच्या १ लाख ७ हजार ९० जागांसाठी ८६ हजार ९१० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यातील ७० हजार २३५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

---

राज्याची अकरावी प्रवेशाची आकडेवारी

शहराचे नाव प्रवेश क्षमता अर्ज करणारे विद्यार्थी प्रवेशित विद्यार्थी रिक्त जागा

अमरावती १५,३६० १३,२२१ १०,८६१ ४,४९९

औरंगाबाद ३१,४७० २१,६२० १६,६२३ १४,८४७

मुंबई ३,२०,३९० २,५८,८५५ २,१८,१७६ १,०२,२१४

नागपूर ५९,२५० ३९,१८८ ३४,४७५ २४,७७५

नाशिक २५,२७० २६,८२२ १९,५०१ ५,७६९

पुणे १,०७,०९० ८६,९१० ७०,२३५ ३६,८५५

Web Title: Admission of students in 82% of the eleven seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.