अभियांत्रिकी पदविकाचे आजपासून संस्थास्तरावरील प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:09+5:302021-01-08T04:33:09+5:30
पुणे : शासकीय व अनुदानित तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी संस्थास्तरावरील प्रवेश ...

अभियांत्रिकी पदविकाचे आजपासून संस्थास्तरावरील प्रवेश
पुणे : शासकीय व अनुदानित तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी संस्थास्तरावरील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर व सोलापुर जिल्ह्यातील प्रवेश मंगळवार (दि. ४) पासून होणार आहेत.
तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दि. व्यं. जाधव यांनी ही माहिती दिली. पदविका अभ्यासक्रमाच्या नियमित दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांसाठी ही प्रवेशफेरी राबविली जाणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे व प्रवेशासाठीच्या शुल्कासह सकाळी १० वाजता संस्थेमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.
--
संस्थानिहाय वेळापत्रक
पुणे जिल्हा -
शासकीय तंत्रनिकेतन, पुणे - ५ जाने.
कुसरो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे - ६ जाने.
शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी (खुर्द) - ७ जाने.
महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरींग टेक्नॉलाजी, पुणे - ५ जाने.
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी - ५ जाने.
कोल्हापुर जिल्हा
शासकीय तंत्रनिकेतन - ५ जाने.
इन्स्टिट्युट ऑफ सिव्हील अॅन्ड रुरल इंजिनिअरींग, गारगोटी - ६ जाने.
सांगली जिल्हा
शासकीय तंत्रनिकेतन, मिरज - ५ जाने.
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, तासगांव - ६ जाने.
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली - ६ जाने
सातारा जिल्हा
शासकीय तंत्रनिकेतन, कराड - ५ जून
सोलापूर-शासकीय तंत्रनिकेतन - ५ जून