कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद : अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST2021-01-08T04:35:26+5:302021-01-08T04:35:26+5:30

शिक्रापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित ...

Admirable work of journalists of Corona period: Ashok Pawar | कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद : अशोक पवार

कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद : अशोक पवार

शिक्रापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार अशोक पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवदीप उंदरे, सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर, शिक्रापूरचे माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, व्यंकटेश कृपा कारखान्याचे संचालक अरुण करंजे, घोडगंगा कारखान्याचे संचालक शिवाजी वडघुले, विलास तापकीर, बाबासाहेब चव्हाण, पंडित दरेकर, ज्ञानेश्वर थेऊरकर,सचिन जकाते आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, पत्रकरांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने होत असलेला सन्मान सोहळा ही कौतुकाची बाब आहे. तर पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांनी देखील कोरोना संक्रमण काळामध्ये जीव धोक्यात घालून काम केल्याने त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे.

सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर यांनी केले तर प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे यांनी आभार मानले.

फोटो ओळ : शिक्रापूर येथे पत्रकार दिनाच्या निमित्त पत्रकार सुनील भांडवलकर यांना सन्मानित करताना आमदार अशोक पवार व मान्यवर.

Web Title: Admirable work of journalists of Corona period: Ashok Pawar