वढु बुद्रुक रस्त्याला साडे सहा कोटीची प्रशासकीय मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:17+5:302021-03-04T04:17:17+5:30

वढू येथे अभिवादनासाठी येणा-या शंभूभक्तांची संख्या वाढली आहे. मात्र कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुकच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या ...

Administrative sanction of Rs. 6.5 crore for Vadu Budruk road | वढु बुद्रुक रस्त्याला साडे सहा कोटीची प्रशासकीय मंजुरी

वढु बुद्रुक रस्त्याला साडे सहा कोटीची प्रशासकीय मंजुरी

वढू येथे अभिवादनासाठी येणा-या शंभूभक्तांची संख्या वाढली आहे. मात्र कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुकच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याबाबत ग्रामपंचायत वढू बुद्रुक, खासदार डॉ. कोल्हे व आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांना या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री पवार यांनी हा निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले होते.

‘पीएमआरडीए’ पहिल्या टप्प्यात प्रजिमा १९ वरील कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या रस्त्याच्या ३.२५० किलोमीटर लांबीपैकी किलोमीटर ०० ते किलोमीटर ९५० या लांबीतील रस्त्याचे १० व १२ मीटर रुंदीकरण व सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामांसाठी ६ कोटी ५८ लाख २७ हजार रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

आमदार-खासदारांच्या माध्यमातून वढूचा मोठा विकास होणार

श्री क्षेत्र वढू बुद्रुकला जोडणा-या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा होणार असल्याने आमदार अ‍ॅड. अशोक पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून वढूचा मोठा विकास होणार असल्याचे श्री क्षेत्र वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.

Web Title: Administrative sanction of Rs. 6.5 crore for Vadu Budruk road