सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता वैशाली भुजबळ व शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी ठेकेदार सागर बांदल यांना बरोबर घेऊन शिवसेना पदाधिकारी तालुका प्रमुख संदिप मते, उपतालुका प्रमुख संतोष शेलार, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, आशिष मते, अनिकेत मते, राहुल मुरलीधर मते, मुरलीधर मते,उपसरपंच विक्रम धोंडगे, माझी सरपंच नारायणशेठ जावळकर, अनिल जावळकर, वैभव बिडकर, शिवकुमार कोणालीकर यांच्यासह संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. गोऱ्हे खुर्द येथील पुलावर नुकताच खानापूर गावातील दुचाकी युवकाचा अपघात होऊन तो जायबंदी झाला होता. त्या ठिकाणी देखील भेट देऊन पाहणी केली. संतप्त नागरिकांनी ठेकेदाराचा चांगलाच समाचार घेतला. धोकादायक स्पॉट शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. चालू कामात पट्ट्या लावून बॅरिकेडिंग करायला सांगितले. जेथे काम चालू नाही. अशा ठिकाणचे खड्डे पुढील आठवड्यात डांबराने भरून घेतले जातील, असा विश्वास ठेकेदार सागर बांदल यांनी दिला. हवेली पोलीस स्टेशनचे होमगार्ड शांताराम राठोड व सत्यम काळे हे देखील उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST