शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 18:01 IST

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून येत्या ६ जुलै रोजी पंढरपूरकडे होणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य, वाहतूक, स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याच्या सुचना

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमिताने जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय कामांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे पालखी सोहळ्याच्या समन्वयाची जबाबदारी विशेष भूमी संपादन अधिकारी यु. डी. भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे. सर्व पालख्यांशी समन्वय ठेवून आषाढी वारी सोहळा व्यवस्थित व शांततेत पार पाडावा, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून येत्या ६ जुलै रोजी पंढरपूरकडे होणार आहे. तसेच संत सोपानकाका महाराज पालखी सासवडहून प्रस्थान करणार आहे. या पालख्या पुणे व सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून पंढरपूर येथे २२ जुलै रोजी पोहचणार आहेत. या पालख्यांसाठी व वारक-यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भोसले यांची नियुक्ती केली आहे. तीन प्रमुख पालखी सोहळ्याचे व इतर पालख्यांचे सहभागी प्रमुख यांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून वेळोवेळी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दयांवर प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करावी. पालखी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका प्राप्त करून मुक्कामाच्या ठिकाणांची नोंद घ्यावी. तसेच पालख्या मार्गक्रमण करताना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात रहावे. त्याचप्रमाणे आरोग्य, वाहतूक, स्वच्छता व पाणी ,गॅस, रॉकेल पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याच्या सुचना भोसले यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका