शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बलिदान स्मरणदिनासाठी प्रशासन सज्ज - सुवेझ हक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:05 IST

‘‘शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व जाती-धर्म-पंथ, संप्रदायाला बरोबर घेऊन केली असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शंभूछत्रपतींचा २९ वा बलिदानस्मरणदिन राज्यातील सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेत नियोजनपूर्वक शांततेत करण्यासाठी परिसरातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्या,’’ असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले.

कोरेगाव - ‘‘शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व जाती-धर्म-पंथ, संप्रदायाला बरोबर घेऊन केली असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शंभूछत्रपतींचा २९ वा बलिदानस्मरणदिन राज्यातील सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेत नियोजनपूर्वक शांततेत करण्यासाठी परिसरातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्या,’’ असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले.१ जानेवारीला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, सुहास गरुड, गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सर्जेराव पाटील, नायब तहसीलदार सुनील शेळके, एस. यू. शेख व शासकीय सर्व विभागांचे अधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना सुवेझ हक बोलत होते.हक म्हणाले, ‘शंभूराजांच्या बलिदान स्मरणदिनाचे योग्य नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करा. वढू-तुळापूर या दोन्ही ठिकाणी शंभूराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी येणाºया दिंड्या, शंभुभक्त यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था, वढू ते चौफुला व तुळापूर येथील खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे व परिसरात विनाखंड वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्हीकडील समाधीस्थळाची साफसफाई व्यवस्थित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तुळापूरच्या शासकीय मानवंदनेसाठी मंत्रालयाची परवानगी आवश्यक असल्याने शासनास प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. लोकांच्या मदतीशिवाय काम करणे शक्य नसल्याने स्थानिक स्वयंसेवकांनी पोलिसांच्या मदतीला यावे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भीमा नदीपात्रात लाईफ गार्ड तैनात ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना दिले. या वेळी छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष संदीप भोंडवे व कार्याध्यक्ष राजेंद्र सातव म्हणाले, पुरंदर ते वढू तुळापूर पालखी सोहळ्यात नारायणपूर ते वाघोली वाहनातून प्रवासात २५० ते ३०० चारचाकी वाहने असल्याने वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याची काळजी घ्यावी. शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद यांनी वढू ते चौफुला रस्ता दुरुस्ती व शिरूर हवेली तालुक्यात पुण्यतिथीदिवशी दारूविक्री बंद ठेवण्याची मागणी केली.पुतळा संरक्षण समिती तयार करादेशात पुतळ्याबाबत चुकीच्या पद्धतीने वातावरण निर्माण झाल्याने व पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने स्थानिक लोकांची पुतळा संरक्षण समिती तयार करा व स्वयंसेवक व ग्रामसुरक्षा दलातील तरुणांनी आपल्या परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण करावे, जेणेकरून समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सुवेझ हक यांनी केले.वढू-कोरेगाव-पेरणेसाठी १ अधिकारी, १५ कर्मचारी१ जानेवारी दंगलीच्या पार्श्वभूमीवर वढू-कोरेगाव-पेरणे येथील पोलीस चौकीसाठी १ अधिकारी, १५ कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर तुळापूरसाठीही पोलीस चौकी तयार करण्याचा प्रस्ताव तयार करून मात्र ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सुवेझ हक यांनी केली.ड्रोन कॅमेºयात करणार कैदशंभू छत्रपतींच्या बलिदानस्मरण दिनानिमित्त वढू-तुळापूर परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेºयांबरोबरच यावर्षी ड्रोन कॅमेºयांचाही वापर करण्यात येणार असल्याने छोट्यात-छोटी गोष्ट ड्रोन कॅमेºयात कैद होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस