प्रशासन-नगरसेवक आमनेसामने

By Admin | Updated: June 11, 2015 06:13 IST2015-06-11T06:13:23+5:302015-06-11T06:13:23+5:30

शहरातील अतिक्रमण कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक पुन्हा आमने-सामने आले असून स्वारगेट येथे बुधवारी महापालिका प्रशासनाने स्वारगेट

Administration-Corporators | प्रशासन-नगरसेवक आमनेसामने

प्रशासन-नगरसेवक आमनेसामने

पुणे : शहरातील अतिक्रमण कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक पुन्हा आमने-सामने आले असून स्वारगेट येथे बुधवारी महापालिका प्रशासनाने स्वारगेट येथील स्टॉलधारकांवर केलेल्या कारवाईस महापौरांसह, उपमहापौरांनी विरोध केल्याने ही कारवाई अर्धवट थांबविण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहर फेरीवाला समितीत झालेल्या चर्चेनुसारच ही कारवाई करण्यात आल्याचा पवित्रा घेत,दोन दिवसात पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या वादात सामाजिक संघटनांनीही उडी घेतली असून महापालिका अशाच प्रकारे मनमानी करणार असेल तर, या कायद्याची अंमलबजावणीच नको असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी पोलिस बंदोबस्तात स्वारगेट वाहनतळापासून कारवाईला सुरुवात झाली. स्टॉल धारकांना पंधरा दिवसांपुर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
राजश्री शाहू महाराज वाहनतळाच्या परिसरातील पंधरा ते वीस टप-यांवर अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच फिरविण्यात आला. आम्हाला स्टॉलमधील वस्तु बाहेर काढू दिल्या नसल्याचा आरोप करीत अतिक्रमण पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न स्टॉलधारकांनी केला. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले जाते. त्यानंतर उपमहापौर बागूल आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महापौरांशी संपर्क साधला त्यानंतर महापौरांच्या आदेशाने ही कारवाई थांबविण्यात आली.

Web Title: Administration-Corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.