अँबॅकसमध्ये अदिती गायकवाडला सुवर्णपदक
By Admin | Updated: February 14, 2017 01:37 IST2017-02-14T01:37:56+5:302017-02-14T01:37:56+5:30
येथील अदिती नितीन गायकवाड हिला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाले आहे. तर प्रा. अर्चना आघाव या बेस्ट टीचर अॅवॉर्डच्या मानकरी ठरल्या

अँबॅकसमध्ये अदिती गायकवाडला सुवर्णपदक
कुरुळी : येथील अदिती नितीन गायकवाड हिला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाले आहे. तर प्रा. अर्चना आघाव या बेस्ट टीचर अॅवॉर्डच्या मानकरी ठरल्या आहेत. संतोष आॅल राऊंडर अॅकॅडेमीच्या माध्यमातून विजेत्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.
संतोष आॅल रॉऊडर अकॅडेमी तर्फे सुंदर हस्ताक्षर आणि चित्रकला या विषयासाठी एकूण सतरा विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील जतीन सचिन शाह, आविष्का सखाराम येळवंडे, गणेश कैलास काळी, अदिती नितीन गायकवाड, प्रियांका चंद्रकांत वाघ, प्रार्थना वीर, साक्षी पाबळकर हे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने, तर कृतिका शाहू, मोक्ष राहुल पगार, मानस शेवकरी आणि अपुर्वा कारंडे हे देशात द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. मयान शेट्टी, मयुरी मेदनकर, आदित्य नेवे, आदित्य बाबासाहेब शितोळे, अदिती जाधव, साक्षी पाबळकर हे विद्यार्थी देशात तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. आर्या खंडागळे, मनस्वी कानसकर, वेदाथोरात, संतोष आघाव, वेदिका गायकवाड, अभिषेक इधाटे, विधी शाह, स्वयम गावडे, सोहम शेळके, ओंकार शेलार, मानव भोसले, लौकिक बोरा, राजवर्धन गोरे, प्रणव बिरादार, अथर्व गोरे, साक्षी गायकवाड, अयान पठाण, नयना कोळी, स्वरांजली मुंगसे, इशा संजय मेथा, संस्कार एरंडे, आदित्य भोसले, सानिका जाधव, दीक्षा गोलांडे, अभय चंद्रशेखर काळे हे विद्यार्थी उपविजेते ठरले. (वार्ताहर)