श्रवणी सोमवारनिमित्त एसटीच्या जादा गाडय़ा
By Admin | Updated: July 22, 2014 23:49 IST2014-07-22T23:49:56+5:302014-07-22T23:49:56+5:30
श्रवणी सोमवारनिमित्त एसटी महामंडळ पुणो विभागातर्फे भीमाशंकर येथे जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

श्रवणी सोमवारनिमित्त एसटीच्या जादा गाडय़ा
पुणो : श्रवणी सोमवारनिमित्त एसटी महामंडळ पुणो विभागातर्फे भीमाशंकर येथे जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. शिवाय मिडी बसची सोय केली असून पहिल्या सोमवारी (दि. 28 जुलै) सुमारे 74 गाडया 12 आगारांमधून सोडण्यात येतील.
भीमाशंकर येथे श्रवणी सोमवारनिमित्त जाणा:या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, शिरुर, मंचर आदी स्थानकांवरुन गाडय़ांची सोय केली आहे. पहिल्या सोमवारी 58 मोठय़ा व 16 मिडी बसेस आणि दुस:या सोमवारी (दि. 4 ऑगस्ट) 65 मोठय़ा व 2क् मिडी बसचे नियोजन आहे.
भीमाशंकर बसस्थानकासह पार्किगजवळ पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. ग्रुप बुकिंगही उपलब्ध आहे, असे एसटी प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रविवारीही जादा सेवा
4श्रवणी सोमवारनिमित्त जाणा:या भाविकांची, तसेच रविवारी पर्यटकांची संख्या मोठी असते. यामध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींचा मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे दर रविवारी मंचरसह विविध स्थानकांवरुन बस सोडण्यात येणार आहेत.