शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अधिकचे दहा हजार रुपये देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 22:00 IST

पुणे शहरामध्ये आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान

ठळक मुद्देमहापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्याची माहितीअतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांना ४ लाखांची मदत या अतिवृष्टीमुळे ४ हजार ७२१ नागरिक बाधितशासनाच्या आदेशानुसार ४३५ बांधितांना १५ हजार रुपयांचे वाटप

पुणे : शहरामध्ये आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या सर्व अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनाच्या निणर्यानुसार अधिकचे दहा हजार रुपयांची मदत तातडीने वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दिली. तसेच यावेळी शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या विविध प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे विषय देखील तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे देखील राम यांनी या बैठकीत स्पष्ट केले.     महापौर मोहोळ यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत या भरपाईसंदर्भात पाठपुरावा केला होता. याचाच पुढचा भाग म्हणून महापौर मोहोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त शांतनू गोयल, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त जयश्री लाभशेटवार यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांना ४ लाखांची मदत देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये लवकरच मिळणार आहेत. या अतिवृष्टीमुळे ४ हजार ७२१ नागरिक बाधित झाले असून, त्यापैकी ४ हजार ३०५ नागरिकांना १५ हजारांपैकी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आह. शासनाच्या आदेशानुसार ४३५ बांधितांना १५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, शिल्लक ४१६ लोकांना देखी ल लवकरच वाढीव मदत वाटप करण्यात येईल, असे राम यांनी स्पष्ट केले. दरम्यान खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंती बांधून देणे हे महापालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी राज्य सरकारकडून ७० कोटी रुपये उपलब्ध व्हावेत, अशी मागणी देखील महापौर यांनी बैठकीत केली. 

टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊसMayorमहापौरNavalkishor Ramनवलकिशोर राम