अतिरिक्त वीज आकार बेकायदेशीर
By Admin | Updated: September 3, 2014 01:01 IST2014-09-03T01:01:44+5:302014-09-03T01:01:44+5:30
नवी दिल्लीच्या विद्युत अपिलीय प्राधिकरणाने अतिरिक्त वीज आकार व इंधन समायोजन आकार रद्द केला आहे.

अतिरिक्त वीज आकार बेकायदेशीर
पुणो : नवी दिल्लीच्या विद्युत अपिलीय प्राधिकरणाने अतिरिक्त वीज आकार व इंधन समायोजन आकार रद्द केला आहे. तसेच, स्वत:हून असा आकार लागू करण्याचा निर्णय दिल्याने महाराष्ट्र विद्युत आयोगावरही ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता महावितरणने ग्राहकांकडून वसूल केलेली 4 हजार 45क् कोटी रुपयांची
रक्कम परत करावी, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली.
टाटा मोटर्स विरुद्ध महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग व महावितरण या प्रकरणी निकाल देताना प्राधिकरणाने हा निर्णय दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत आयोगाचा 5 सप्टेंबरचा निर्णय रद्द केला आहे. महावितरणने अतिरिक्त वीज अकार व इंधन समायोजन आकारापोटी सप्टेंबर 2क्13 ते जानेवारी 2क्14 या कालावधीत दरमहा 89क् कोटी रुपयांची वसुली ग्राहकांकडून केली. तसेच त्यानंतर फेब्रुवारी 2क्14
पासून सरकारने अनुदानापोटी
7क्6 कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कमदेखील परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कंपनीची कोणती याचिका नसताना आयोगाने स्वत:हून असा आदेश देणो चुकीचे आहे. तसेच दरवाढ असूनही ग्राहकांसाठी कोणतीही जाहीर सुनावणी ठेवली
नाही. तसेच वीज आकाराच्या रकमा ठरविण्याचे अधिकारही कंपनीलाच देण्यात आले. नैसर्गिक न्याय व ग्राहकांचे हितरक्षण या बाबींचा भंग आयोगाने केला
असून, कंपनीच्या सोयीसाठी असा आदेश दिला आहे.
या कृतीमुळे वीज कायद्यातील 62, 64 व 86 (3) या कलमांचा भंग झाल्याने हा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे प्राधिकरणाने 22 ऑगस्ट 2क्14च्या निकालपत्रत स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयोगाला आता नव्याने या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे होगाडे म्हणाले. (प्रतिनिधी)