पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जारी केलेल्या आदेशाचे दुकानदारांकडून गांभीर्याने पालन होत नसल्याने, आता महापालिकेने थेट कारवाईचा बडगा उचलला आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन व दुकानासमोरील गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने ४८ तासांसाठी सील करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. गुरूवारी महापालिका भवन परिसरातील ७ दुकाने ४८ तासांसाठी महापालिकेने सील केली आहेत. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई किती रक्कमेची असावी याची निश्चिती शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनी 'या' दुकानदारांना शिकवला चांगलाच धडा; ४८ तासांसाठी ठोकले सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 21:49 IST
गुरूवारी महापालिका भवन परिसरातील ७ दुकाने ४८ तासांसाठी महापालिकेने सील केली आहेत.
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनी 'या' दुकानदारांना शिकवला चांगलाच धडा; ४८ तासांसाठी ठोकले सील
ठळक मुद्देगर्दी रोखण्यासाठी उपाययोजना न करणारी दुकाने ४८ तासांसाठी सील करण्याची कार्यवाही