शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी साडेसहा कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:20 IST

शहर आणि जिल्ह्यासह ग्रामीण भागात २५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देपूरग्रस्त बांधित : वाढीव रक्कमेचे लवकरच वाटप सुरु होणार जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त झाल्याबरोबर बाधित कुटुंबांना तात्काळ वितरीत

पुणे : शहर आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे बांधित झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने नुकताच सुमारे ६ कोटी ४४ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शासनाच्या नियमानुसार बांधित लोकांना वाढीव निधीचे वाटप सुरु करणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. शहर आणि जिल्ह्यासह २५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, अनेकांचे संसार उद्वस्त झाले. काही नागरिकांनी आपले प्राण देखील गमावले. तर मोठ्या प्रमाणात प्राण हानी व वित्तीय हानी देखील झाली. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  शासनाकडे निधीची मागणी केली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात तातडीने मदत केली. परंतु शासनाच्या स्वतंत्र अदेश काढून वाढीव मदत करणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार जिल्ह्यासाठी अधिकच्या निधीची गरज असल्याचे जिल्हाधिकाºयांनी शासनाला लेखी कळविले होते. त्यानुसार हा निधी मंजूर केला आहे. जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त झाल्याबरोबर बाधित कुटुंबांना तात्काळ वितरीत करण्यात यावा. सदर निधी ज्या हेतूसाठी वर्ग केला आहे. त्याच कारणासाठी वापरावा. कोणत्याही परिस्थितीत मंजूर निधीपेक्षा अधिक खर्च होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, तसेच वितरीत अनुदानातून जर काही रक्कम खर्ची पडणार नसेल तर ती विहित वेळेत शासनास समर्पित करावी, अशा सूचना महसूल विभागाचे उपसचिव सु. ह. उमरणीकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरState Governmentराज्य सरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका