वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाला हवी वात्सल्याची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:14+5:302021-04-11T04:11:14+5:30
पुणे: आधुनिक वैद्यकशास्त्र बरेच प्रगत झाले आहे, मात्र त्यातील वात्सल्याची गरज आजही कायम आहे व पुढेही राहणार आहे, असे ...

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाला हवी वात्सल्याची जोड
पुणे: आधुनिक वैद्यकशास्त्र बरेच प्रगत झाले आहे, मात्र त्यातील वात्सल्याची गरज आजही कायम आहे व पुढेही राहणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी केले.
श्रीमती अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे वैद्यकीय सेवकांचा कृतज्ञता सन्मान अलायन्स मुनोत हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी अशा ५० वैद्यकीय सेवकांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, डॉ. विजय पोटफोडे, सदाशिव कुंदेन, शिरीष मोहिते यावेळी उपस्थित होते. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.योगेश आणि डॉ.आयुषी आसवा यांनी हा सन्मान स्वीकारला. डॉ. विजय पोटफोडे यांनी कोरोनाच्या काळात कोविड रुग्ण व इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार देण्याची कसरत रुग्णालयांनी केली याचे श्रेय डॉक्टरांसोबत परिचारिका व इतर सेवकांनाही आहे असे सांगितले.
शाहीर मावळे, शिरीष मोहिते यांचीही भाषणे झाली. अॅड.वृषाली जाधव-मोहिते, विराज मोहिते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विक्रांत मोहिते यांनी प्रास्ताविक केले.