रमेश गडदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:11 IST2021-09-27T04:11:30+5:302021-09-27T04:11:30+5:30
शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे यांनी गावामध्ये विविध विकासकामे मार्गी लावत गाव आदर्श ग्रामच्या दिशेने घेऊन जाण्यास ...

रमेश गडदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे यांनी गावामध्ये विविध विकासकामे मार्गी लावत गाव आदर्श ग्रामच्या दिशेने घेऊन जाण्यास प्राधान्य दिले. कोरोनाकाळात त्यांनी विशेष उपाययोजना राबवून कोरोनामध्ये अनोखा संघर्ष केला. वृक्षारोपणालादेखील विशेष महत्त्व दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार रमेश गडदे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे, सरचिटणीस बाबासाहेब पावसे, शंकरराव खेमणार, जयदीप वानखेडे, भाऊसाहेब मरगळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, जहांगीरभाई तांबोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ -
शिक्रापूर येथील सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करताना मान्यवर. (छाया : धनंजय गावडे)