अभिनेत्रीने चोरले दागिने

By Admin | Updated: June 15, 2015 06:09 IST2015-06-15T06:09:23+5:302015-06-15T06:09:23+5:30

मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्रीने ब्यूटीशियनच्या घरामधून १ लाख ८४ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी

Actress stole jewelery | अभिनेत्रीने चोरले दागिने

अभिनेत्रीने चोरले दागिने

पुणे : मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्रीने ब्यूटीशियनच्या घरामधून १ लाख ८४ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चंदननगर पोलिसांनी या अभिनेत्रीला अटक केली असून, सध्या ती पोलीस कोठडीमध्ये आहे.
स्नेहल वसंत पाटील (वय २५, रा. कोंढवा) या अभिनेत्रीचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती शिवाजीराव भगत (वय ३४, रा. ममता हौसिंग सोसायटी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल मूळची गोव्याची राहणारी असून, ती गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालेली आहे. ती नवोदित अभिनेत्री असून, तिने एका पंजाबी चित्रपटात भूमिका केली आहे. फिर्यादी भगत यांचा मेकअप आणि डे्रपरीचा व्यवसाय आहे. फिर्यादीनुसार, ८ जून रोजी स्नेहल भगत यांच्या घरी मेकअप करून घेण्यासाठी, तसेच कपडे घेण्यासाठी ती गेली होती. भगत यांच्या बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या स्नेहल हिने बेडरूममधील कपाटातील दागिने कपड्यांमध्ये लपवून चोरून नेले होते. स्नेहल घरामधून गेल्यानंतर भगत यांना बेडरुममधील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Actress stole jewelery