शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला हवालदार जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:47 IST

तक्रारदार यांचे पिंपळे गुरव येथील ६० फुटी डीपी रोडवर भाडेतत्वावर दुकान

पुणे : दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.  संगीता विनाद गायकवाड (वय ४८, सांगवी पोलीस ठाणे) असे या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे.तक्रारदार यांचे पिंपळे गुरव येथील ६० फुटी डीपी रोडवर भाडेतत्वावर दुकान होते. या दुकानाचा करारनामा संपूनही त्यांनी ते खाली न केल्याने मुळ मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी संगीता गायकवाड यांच्याकडे होती. त्यांनी तक्रारदार यांना दुकान खाली करण्यासाठी मुदतवाढ देते. तसेच मदत करते म्हणून तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. दुकानदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात संगीता गायकवाड यांनी तडजोड करुन दीड हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पोलीस अधीक्षक राजेश् बनसोडे, अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, गिरीश सोनवणे, हवालदार अंकुश माने, श्रीकृष्ण कुंभार, सहायक फौजदार जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारतात. संगीता गायकवाड यांना पकडण्यात आले. सांगवी पोलीस ठाण्यात लाच लुचप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :SangviसांगवीCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण