लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त येणाऱ्या लोकांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:00 AM2020-11-29T04:00:04+5:302020-11-29T04:00:04+5:30

\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे लग्न ...

Action will be taken against more than 50 people attending the wedding ceremony | लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त येणाऱ्या लोकांवर कारवाई करणार

लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त येणाऱ्या लोकांवर कारवाई करणार

Next

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे लग्न व इतर समारंभात ५० पेक्षा जास्त संख्येने येणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी काढला आहे़

लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमामध्ये लोक मोठ्या संख्येने सामील होत असल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे़ तुलशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात़ लॉकडाऊनमुळे गेल्या ८ महिन्यात अनेक समारंभ पुढे ढकलले गेले आहेत़ त्यामुळे या पुढील काळात लग्नासह अनेक इतर समारंभ होण्याची शक्यता आहे़ त्यातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये़ हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय व्यावसायिकांनी दिलेल्या सूचना व अटींचे पालन करावे़ लग्न व इतर समारंभासाठी येणाऱ्या लोकांची यादी संबंधित व्यावसायिकांनी स्वत:कडे ठेवावी़ सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत़ बेकायदा जमाव/ कायद्याचे उल्लंघन करु नये़ अन्यथा आदेशाचे पालन न करणाºयांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Action will be taken against more than 50 people attending the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.