शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

निष्क्रीय कार्यकर्त्यांवर करणार कारवाई, अजित पवार यांचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 20:58 IST

‘आओ जावो, घर तुम्हारा चालणार नाही. मेरीट असणाºयांनाच महापालिका निवडणूकीत संधी देणार.'

पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड वाल्हेकरवाडी येथे आयोजित केलेल्या विचारवेध प्रशिक्षण कार्यक्रमास महिला आणि तरूण कार्यकत्यांची अनुपस्थितीबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. ‘‘आओ जावो, घर तुम्हारा चालणार नाही. निष्क्रिीय कार्यकर्त्यांवर कारवाई करणार आहे. याच काय आणि त्याच काय? हे आता मी ऐकुण घेणार नाही. तसेच मेरीट असणाºयांनाच महापालिका निवडणूकीत संधी देणार आहे, सत्ताधारी भाजपाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवा, तसेच पक्षसंघटना मजबूत करा, असेही मार्गदर्शन पवार यांनी केले. शहरातील प्रमुख नेत्यांची हजेरीही घेतली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या विचार वेध प्रशिक्षण वाल्हेकवाडीत झाले. यावेळी विविध माध्यमप्रतिनिधींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  यावेळी ज्येष्ठ नेते छगन भूजबळ, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे, संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख तसेच आजी माजी महापौर पदाधिकारी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात उद्घाटनाच्या वेळी अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे भाजपाने भूलथापा देऊन लूट केली आहे. सत्ताधारी भाजपाने केवळ भ्रष्टाचार केला असून एकही ठोस असे काम केलेले नाही. त्यास कारणीभूत दिशाहीन नेतृत्व आहे.  पाणीपुरवठा, संतपीठ, अर्बनस्ट्रीटच्या कामांत गैरव्यवहार केले आहेत. पुढील काळात शंभर घोटाळे काढणार आहोत. ’ समारोपाच्या सत्रात अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच पदाधिकाºयांचे कान टोचले. पवार म्हणाले, ‘‘तीन विधानसभा मतदार संघातून महिला आणि तरूणांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून येत आहे. ही बाब गांभिर्याने घ्यायला हवी. पिंपरीतील महिलांची बैठक झालीच नाही. निरीक्षकही दिले आहेत. जुण्या-नव्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. तसेच विद्यार्थी संघटनेनेही गांभिर्याने घ्यायला हवे. तसेच आजी माजी पदाधिकाºयांनी नगरसेवकांनी अ‍ॅक्टिव्ह व्हायला हवे. जो काम करीत नसेल त्याला बदलले जाईल. चुकीच्या कामाविरोधात होणाºया आंदोलनातही महिलांचा सहभाग कमी आहे. ही बाब चांगली नाही.’’दादांनी घेतली हजेरीअजित पवार यांनी भाषणात स्थानिक नेत्यांची हजेरी घेतली. कानही टोचले. पवार म्हणाले, ‘राजू मिसाळ, डब्बू आसवानी कुठे आहेत.’’ त्यावर उपस्थितांमधून लग्न किंवा अन्य कार्यक्रमांना गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, ‘बघा नक्की लग्नालाच गेलेत का अन्य कोठे?  याबाबत अध्यक्षांनी मला माहिती द्यावी.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस