बोगस ठेकेदारांवर कारवाई करणार

By Admin | Updated: June 13, 2015 22:35 IST2015-06-13T22:35:27+5:302015-06-13T22:35:27+5:30

पुणे व कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात सन २००४ ते २०१५ या कालावधीत नोंदणी झालेल्या ठेकेदारांची सर्व माहिती घेऊन

Action will be taken against bogus contractors | बोगस ठेकेदारांवर कारवाई करणार

बोगस ठेकेदारांवर कारवाई करणार


इंदापूर : पुणे व कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात सन २००४ ते २०१५ या कालावधीत नोंदणी झालेल्या ठेकेदारांची सर्व माहिती घेऊन, खोटी कागदपत्रे जोडून बोगस ठेकेदारांची नोंदणी प्रमाणपत्र बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व बोगस ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे, अशी माहिती रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी दिली.
पुणे आणि कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात उपरोक्त कालावधीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे, ठेकेदारांची बोगस नोंदणी प्रमाणपत्र तयार करण्यात आली. त्या आधारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व बोगस ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे करुन तसेच कामे न करता कोट्यवधी रुपयांची कमाई केली, असा रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांचा आरोप आहे.
याबाबतची कागदपत्रे जमा करुन त्यांनी बोगसगिरी उघड करण्यासाठी तीन वर्षांपासून तक्रार करण्याची मोहिम उघडली आहे. या संदर्भात 'लोकमत'ने मध्यंतरी वृत्तही प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर मखरे
यांनी बुधवारी (दि. १० जून) मंत्रालयात जाऊन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आपण केलेल्या तक्रारीसंदर्भात त्यांना सविस्तर
माहिती दिली.
कागदपत्रे सादर केली.त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. सन २००४ ते २०१५ या कालावधीतील ठेकेदारांची सर्व माहिती
घेऊन, बोगस ठेकेदार व नोंदणीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले, अशी माहिती मखरे यांनी
दिली. (वार्ताहर)

Web Title: Action will be taken against bogus contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.