शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती आवारातील टपऱ्यांवर कारवाईच  : बी.जे.देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:49 IST

मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ठळक मुद्देबाजार बंदची भूमिका शेतकरी विरोधीडॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून टपरी धारकांवर कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या मार्केटयार्डमधील सर्व अनधिकृत टप-या काढून टाकण्याचा निर्णय अखेर बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. या सर्व टपरी धारकांना दिलेल्या नोटिशीची मुदत रविवारी (दि. १९ जून) संपत असून बाजाराला अडथळा निर्माण करणा-या या सर्व टप-या काढून टाकण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा दिला आहे. बाजार बंदची आढाव यांची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी येथे सांगितले. मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासंदर्भात समितीही गठीत करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर अनधिकृत टप-यांचा वाहतूक आणि व्यवहारास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व टप-या काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही देशमुख यांनी नमुद केले. याबाबत देशमुख यांनी सांगितले की बाजारातील फळे, तरकारी, फुले, कांदा-बटाटा आणि भुसार विभागात सुमारे सुमारे १५० टप-या आहेत.यातील १०९ टप-या १९८० पासून अनेक वेळा टप-या काढून घेण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. यातील काही टपरी धारकांकडून बाजार समिती भाडयासाठी शुल्क आकारत आहे. तर नव्याने झालेल्या ४१ टप-यांची कोणतीच नोंद नाही. या सर्व टप-यामुळे बाजाराच्या आवारात वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक वेळा वाद देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व टप-या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.---------------बाजार आवारातील सर्व टप-या अधिकृत करण्याची मागणी टपरी चालक करत आहेत. प्रशासनाने दिलेल्या नोटीसा व कारवाईच्या विरोधात आंदोलन देखील सुरु केले आहे. तसेच टप-या काढल्यास बाजार बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे. अनधिकृत टप-यांना संरक्षण देण्यासाठी बाजार बंद करणे म्हणजे शेतक-यांच्या विरोधात भूमिका घेण्यासारखी आहे. त्यामुळे अनधिकृत टप-या वाचविण्यासाठी टपरी चालकांनी शेतक-यांना वेठीस धरू नये, असेही देशमुख यांनी सांगितले.------------------

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावMarket Yardमार्केट यार्ड