अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
By Admin | Updated: October 4, 2015 03:50 IST2015-10-04T03:50:42+5:302015-10-04T03:50:42+5:30
शत्रुंजय मंदिरासमोरील साधारण १५० अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे शनिवारी धडक कारवाई करण्यात आली. महापालिका अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, मालमत्ता

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
कात्रज : शत्रुंजय मंदिरासमोरील साधारण १५० अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे शनिवारी धडक कारवाई करण्यात आली.
महापालिका अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, मालमत्ता व्यवस्थापन व क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या झोपड्यांवर जेसीबी फिरविण्यात आला. विविध राजकीय, सामाजिक संस्थांच्या झेंड्यांमुळे झोपड्यांना अभय मिळत होते. केवळ जागा लाटण्यासाठी झोपड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.
सन २०१३-१४दरम्यान याच ठिकाणी सुमारे ४५० अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. त्यानंतर हळूहळू त्या जागेवर झोपड्यांचे जाळे पसरले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या कारवाईत सर्व विभागात योग्य समन्वय असल्याने कोठेही गोंधळ झाला नाही. स. नं. ४६ व ४७ गोकुळनगर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जवळपास ४ एकर जैवविविध आरक्षित (बीडीपी) जागेवर ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान कोणीही विरोध केला नाही. (वार्ताहर)