भिगवणमध्ये अनधिकृत पार्किंगवर कारवाई
By Admin | Updated: June 17, 2015 00:45 IST2015-06-17T00:45:35+5:302015-06-17T00:45:35+5:30
भिगवणची मुख्य बाजारपेठ, पुणे-सोलापूर महामार्ग, हायस्कूल रोड, मदनवाडी, चौफुला या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

भिगवणमध्ये अनधिकृत पार्किंगवर कारवाई
भिगवण : भिगवणची मुख्य बाजारपेठ, पुणे-सोलापूर महामार्ग, हायस्कूल रोड, मदनवाडी, चौफुला या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे भिगवण पोलिसांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
भिगवण (ता. इंदापूर) येथे अनधिकृत पार्किंगच्या समस्येमुळे सर्व्हिस रस्त्यावर वाहन चालविणे जिकिरीचे झाले होते. मात्र, आता आवश्यक पोलिसांची उपलब्धता झाल्याने भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भिगवणमधील मुख्य रस्ता आणि मदनवाडी पुलाखालील पार्किंग नियोजन केले आहे. तसेच, अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पार्किंगची कोणतीच शिस्त नसल्याने, तसेच येथे बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे रस्त्यांचे बोळीत रूपांतर झालेले होते. आवश्यक पोलीस संख्या नसल्याने पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखताना दिवसरात्र काम करणे भाग पडत होते.
मात्र, आता अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात होत असलेल्या कारवाईत सातत्य राहावे, भिगवण बाजारपेठेतून अतिवेगाने दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन चालकांवर कारवाई करावी, हॉटेल व्यावसायिक यांच्या ग्राहकांना वाहन रस्त्यावर लागणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, अशी भिगवणकरांनी अपेक्षा आहे.