आळंदीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर कारवाई
By Admin | Updated: February 4, 2015 00:28 IST2015-02-04T00:28:25+5:302015-02-04T00:28:25+5:30
अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला.

आळंदीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर कारवाई
पुणे : अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. यामुळे नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ नुसार दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आळंदी परिसरात अन्य लोकप्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.
वेळेवर कामे होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर व नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला़
याप्रकरणी पोलिसांनी राहुल चितळकर, प्रशांत कुऱ्हाडे व
अन्य चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, ते पळून गेले आहेत़
माझ्यावर सोपविलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडताना व उच्च न्यायालयाने वेळोवेळी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करताना शासकीय कामात अडथळा आणून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरी अधिनियम १९६५ चे
कलम ४२ अन्वये त्या दोघांचे
सदस्यपद रद्द करावे, अशी
मागणी औंधकर यांनी नगरविकास मंत्रालयाला निवेदन देऊन केली होती. औंधकर यांनी तीर्थक्षेत्र आराखड्यानुसार बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारील अनधिकृत मंदिराचे बांधकाम थांबविण्यास सांगितले होते़ तेथे गेलेले आरोग्य कर्मचारी रमेश थोरात यांना चितळकर यांनी शिवीगाळ केली होती़ याचाच राग मनात धरून चितळकर आणि कुऱ्हाडे यांनी औंधकर यांच्यावर खुनीहल्ला केला.
४आळंदी नगरपालिकेच्या क्षेत्रात अन्य अनेक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी आळंदी परिसरातील प्रामुख्याने लोकप्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणांची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.