शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

तडीपार तीन गुंड जेरबंद, खडक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:33 IST

पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही शहरात येऊन लोकांना मारहाण करून दहशत पसरविणाºया तीन गुंडांसह सात जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे  - पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही शहरात येऊन लोकांना मारहाण करून दहशत पसरविणाºया तीन गुंडांसह सात जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे़टिक्या ऊर्फ श्रीनाथ अशोक शेलार (वय २०, रा़ घोरपडे पेठ), राहुल श्याम भरगुडे (वय २२, रा़ साठे कॉलनी, सदाशिव पेठ) आणि विपुल बबनराव इंगवले (वय २१, रा़ खडकमाळ आळी) अशी तडीपार गुंडांची नावे आहेत़ त्यांच्यासह सागर ऊर्फ भेंड्या दत्तात्रय शिंदे (वय २८, रा़ पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), सोन्या ऊर्फ जयंत प्रमोद शेलार (वय २२, रा़ वसंतलता सोसायटी, कात्रज-कोंढवा रोड व झगडेवाडी, घोरपडे पेठ), अक्षय संजीव जाधव (वय २१, रा़ कैकाडआळी, घोरपडे पेठ), अनिकेत पांडुरंग नवगिरे (वय २२, रा़ पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़याबाबत पोलिसांनी सांगितले की, बसवराज गुंडप्पा कत्रे (वय ३०, रा़ इंदिरानगर, गुलटेकडी) हे त्यांच्या मित्रांसह पीएमसी कॉलनी येथे राहणारे अमिर दिलावर शेख यांच्या व त्यांच्या पत्नीमध्ये झालेला वाद मिटविण्यासाठी ५ मार्चला त्यांच्या घरी गेले होते़त्या वेळी सागर शिंदे व त्याचे साथीदार तेथे येऊन कत्रे यांना ‘तुम्ही येथे का आला, तुमचा काय संबंध असे म्हणून तुम्ही निघून जा,’ असे सांगितले़ त्याचा जाब विचारल्यावरून कत्रे व त्यांचे मित्र प्रसाद जोरी यांना लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले होते़पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक निरीक्षक उमाजी राठोड, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे तसेच कर्मचारी विजय कांबळे, विनोद जाधव, विश्वनाथ शिंदे, बापू शिंदे, राकेश क्षीरसागर, गणेश सातपुते, रवी लोखंडे, संदीप कांबळे, अनिकेत बाबर, महेश कांबळे यांनी ही कामगिरी केली़तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखलया गुन्ह्याचा तपास करताना सागर शिंदे याला पकडल्यानंतर, इतरांची नावे स्पष्ट झाली़ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार : सापळा रचून इतरांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडले़ श्रीनाथ शेलार यांच्याविरुद्ध जबरी चोरी, अपहरण, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी असे ५ गुन्हे आहेत़राहुल भरगुडे यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, घातक शस्त्रे बाळगणे, दंगा, मारामारी असे ४ गुन्हे आहेत़ विपुल इंगवले यांच्याविरुद्ध दरोड्याची तयारी, दंगा, मारामारी, अपहरण, दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे ८ गुन्हे दाखल आहेत़ पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी या तिघांना पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते़ त्यांना पोलिसांनी अटक केली आहे़ न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़

टॅग्स :Arrestअटक