शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

भोरला अतिक्रमणांवर हातोडा : कारवाईला मिळाला मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 2:05 PM

राजवाड्याच्या धोकादायक भिंतीजवळ बेकायदेशीर टाकलेल्या टपºया व घरांची अशी १९ अतिक्रमणे काढण्यात आली.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त, रस्ते घेणार मोकळा श्वासभोर नगरपलिकेने अतिक्रमण केलेल्या लोकांना दिल्या होत्या नोटीसा

भोर : भोर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि आणि इतर ठिकाणांवरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत होती. या अतिक्रमणांवर भोर नगरपालिकेने गुरुवारीकारवाई करत राजवाडा चौकातील राजवाड्याच्या धोकादायक भिंतीजवळ बेकायदेशीर टाकलेल्या टपऱ्या व घरांची अशी १९ अतिक्रमणे काढण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  भोर नगरपलिकेने अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे आपआपली अतिक्रमणे नागरिकांनी स्वत:हून काढली. गुरुवारी सकाळपासून भोर शहरातील नगरपलिकेजवळच्या अग्निशामन केंद्राच्या जागेतील दोन पक्की घरे पाडून अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राजवाडा चौकातील राजवाड्याची इमारत धोकादायक झाली असून भिंत पडल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या इमारतीखाली असलेल्या १२ टपऱ्या काढण्यात आल्या. त्याचबरोबर वेताळपेठ येथील एक दुकान व इतर ६ टपऱ्या अशी दोन घरे व १७ टपऱ्यावर हातोडा आज मारण्यात आला आहे.सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी संतोष वारुळे, शाखा अभियंता संजीव सोनवणे १० आरसीपी पथकाचे पोलीस तर भोर, राजगड, सासवड पोलीस ठाण्याचे २५ पोलीस असा एकूण ३५ पोलीस बंदोबस्त आणि एक जेसीबी आणि भोर नगरपलिकेचे कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.टप्प्याटप्प्याने पोलीस बंदोबस्त मागवून एसटी स्टँड, सुभाष चौक, नगरपलिका चौक ते चौपाटीपर्यंत रस्त्याशेजारी असलेली अतिक्रमणे तसेच शेडची काढण्याचे काम पुढील काही दिवसांत करून रस्ता मोकळा करुन वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी सांगितले.

टॅग्स :bhor-acभोरEnchroachmentअतिक्रमण