शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 16:59 IST

पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण

पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

अमन संजय दिवेकर (वय २०, रा. खडके वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गेल्या ३ वर्षात जीवघेणी हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न करणे, जबरी दुखापत, दंगा, बलात्कार, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे गंभीर ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नव्हते.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्तांना सादर केला. अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शुक्रवारी अमन दिवेकर याला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवलंबिले आहे. त्यानुसार मागील वर्षामध्ये ११ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते. नव्या वर्षात ३ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तYerwadaयेरवडा