शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मृत्यू दाखल प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई, मात्र अधिकाऱ्याला अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:48 IST

महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पुणे :पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याप्रकरणी कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. त्याला अभय देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी महापालिकेच्या कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश निगडे व शुभम संजय पासलकर यांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी मृत्यूच्या खोट्या नोंदणी केल्याने महापालिकेचे संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे, असे पत्र महापालिकेस पाठविले आहे.कुंभार म्हणाले, जन्म-मृत्यू दाखल्यावर सही करण्याचे अधिकार हे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला आहेत. सरकारी काम असलेल्या प्रत्येक कामाची, तसेच त्याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्याचीच असते. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवणे कायदेशीरदृष्ट्या सहज शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित कटात सहभागी असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी असल्याचे कुंभार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका