वीज चोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:51+5:302021-02-05T05:20:51+5:30

आव्हाळवाडी : वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या मुळशी विभागाकडून विशिष्ट पथक स्थापन केले आहे. शुक्रवार (दि.२९) रोजी ...

Action taken against 25 customers for stealing electricity | वीज चोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई

वीज चोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई

आव्हाळवाडी : वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या मुळशी विभागाकडून विशिष्ट पथक स्थापन केले आहे. शुक्रवार (दि.२९) रोजी वाघोलीसह परिसरातील गावांमध्ये विजेची चोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई केली आहे. यापुढे कारवाई महावितरणाच्या नियमानुसार केली जाणार असल्याची माहिती वाघोली येथील सहायक अभियंता गणेश श्रीखंडे यांनी दिली.

महावितरणाच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली शाखा येथे विशिष्ट पथक स्थापन केले. या पथकामध्ये वरिष्ठ कार्यालयामधील अधिकाऱ्यांचा समावेश असून गावांमध्ये चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या पथकाद्वारे वाघोली, पेरणे भागामध्ये सक्रीय राहणार असून महावितरणाच्या नियमानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाघोलीचे सहायक अभियंता गणेश श्रीखंडे यांनी दिली आहे. शुक्रवार (दि. २९) रोजी आहे. या पथकाने वाघोली, लोणी कंद, बकोरी, आव्हाळवाडी, पेरणे परिसरातील २५ ग्राहकांवर वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाबरेकर व सहायक अभियंता बाबर, सहायक अभियंता गणेश श्रीखंडे, सहायक अभियंता अंकुश मोरे व विद्युत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Action taken against 25 customers for stealing electricity