ग्रामसेवक कांबळेंवर निलंबनाची कारवाई
By Admin | Updated: June 17, 2015 22:43 IST2015-06-17T22:43:05+5:302015-06-17T22:43:05+5:30
राहू बेट परिसरातील देवकरवाडी, पिलाणवाडी व टेळेवाडी या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एम.एच कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती

ग्रामसेवक कांबळेंवर निलंबनाची कारवाई
राहू : राहू बेट परिसरातील देवकरवाडी, पिलाणवाडी व टेळेवाडी या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एम.एच कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. उमाप यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तंटामुक्ती गाव म्हणून शासनाकडून मिळालेले पैसे तसेच ग्रामसेवक एम.के.कांबळे यांनी बोगस बिले दाखवून ग्रामपंचायतीच्या खात्यातून हजारो रुपये गायब केले असल्याचा आरोप ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला आहे. माहिती सेवा समितीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल सोन्याबापू थोरात यांनी संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करावे यासाठी जिल्हा परिषेद कार्यालयासमोर मंगळवार (दि.१६) पासून अमरण उपोषणास सुरूवात केली होती. संबंधित ग्रामसेवकांने त्याच्या कार्यकाळामध्ये बेजबाबदारपणे काम करुन स्वहित साधण्याचा प्रयत्न केला आहे. जादा खर्च करून अपहार करणे, वेळेवर ग्रामसभा व मासिक सभा न घेणे यासारखे गंभीर प्रकार असल्याने ग्रामसेवक कांबळे यास सेवेतुन तात्पुरते निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. (वार्ताहर)