शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:45 IST

नागरिकांकडून अधिकचे पैसे घेऊन ब्लॅक मार्केटिंग देखील केले जात असल्याच्या तक्रारी

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरिता समन्वय

पुणे : सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने काही व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून कृत्रिम  टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. तसेच अधिकचे पैसे घेऊन ब्लॅक मार्केटिंग देखील केले जात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या तक्रारींची वेळीच दखल घेत साठेबाजी व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात खास पथके नियुक्त केली आहेत. तसेच अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय 11 पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधे यांची सद्यस्थितीत एकूण 27 हजार 210 दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत.सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरीता मार्केट कमिटी, होलसेलर व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. काही जिल्हाबाह्य व राज्यबाह्य वाहतुकीने येणारी अन्नधान्य वाहने पोलीसांकडून अडविण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र 92 गाडयांची काल आवक झाली आहे.दरम्यान लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांकरीता पेट्रोल, डिझेल तुटवडा होऊ नये याकरिता पुढील कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांकरिता पेट्रोल व डिझेल साठा राखीव ठेवण्यात यावा, असे पेट्रोलियम कंपन्यास कळविण्‍यात येत आहे. अत्यावश्यक सेवांकरिता लागणा-या मनुष्यबळाला पुरवठा कार्यालयातर्फे ओळखपत्र देण्यात येत असून 4096 ओळखपत्र विविध आस्थापनांना वितरित करण्‍यात आलेली आहेत.‐-------रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. टोल फ्री क्रमांक 1077मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8.00 ते रात्री 8.00)मोबाईल क्रमांक 9405163924

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामMarketबाजारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस