शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:12 IST

कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते, त्यांचा राग होता का कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. आज सकाळी दोन्ही कुटुंबियांकडून संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळेने माध्यमांशी संवाद साधला. या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे. कुणालाही सोडू नका अशी मागणी असावरीने केली आहे. 

असावरी जगदाळे म्हणाली, काश्मीरमध्ये पहलगाममध्ये त्या उंच जागेवर आम्ही ३० मिनिट चढून तिथं गेलो होतो. जागा खूप सुंदर आहे. फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली. तेव्हा लोक पळायला लागली. आम्ही टेंटमध्ये लपलो. गणबोटे काका खाली झोपले होते. अनेक लोक लपली होती. अनेक लोकांवर फायरिंग झाली. एकजण आमच्याकडे आला. त्याने आम्हाला पकडून गोळ्या मारायला सुरुवात केली. माझ्या वडिलांना ३ गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. त्यांनी फक्त पुरुषानं मारलं.  त्यानंतर आम्ही तिथून पळून आलो. सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली. मला तिथ चक्कर आली होती. त्यानंतर मिलिटरी पोहचली होती. सगळ्या जखमी लोकांना श्रीनगर मध्ये शिफ्ट केलं गेल होत. रात्री १२ वाजता कळलं की काही जणांचा मृत्यू झाला. आम्हाला ओळख पटविण्यासाठी नेण्यात आलं मला तेव्हा कळलं की बाबांचा आणि काकांचा मृत्यू झाला आहे.  

कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका

आर्मिने खूप मदत केली. माझे वडील माझ्या कुटुंबाचे आधार होते. एकमेव कमवते होते. आज मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून आले. मला हे विसरण खूप अवघड आहे.  माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडीलांना गोळ्या मारल्या आहेत. हे माणस नाहीत राक्षस आहेत. ते पहाडी मधून जंगलातून अचानक आले. चारही बाजूला मृतदेह दिसत होते. ते अतिरेकी कुठून आले सांगू नाही शकणार. कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका. ते ४ ते ५ लोक होते. १५ ते २० मिनिट हे सगळं सुरू होत. 

 लहान मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही

कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते. त्यांचा राग होता का कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही. माझे वडील म्हणत होते तुम्हाला जे हवंय ते करतो पण तरीही त्यांनी मारलं. अनेकांच्या डोक्यात गोळ्या मारल्या होत्या. ते म्हणत होते की आम्ही लहान मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरFamilyपरिवारtourismपर्यटनterroristदहशतवादी