पप्पू ऊर्फ शंभू सतीश कवडे (राहणार कात्रज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर) या आरोपीवर दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याविषयी पोलीस काॅन्स्टेबल ए. पी. गवळी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारी भीमा नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली.
मलठण (ता. दौंड) गावच्या हद्दीत आरोपी पप्पू ऊर्फ शंभू सतीश कवडे भीमा नदीपात्रात बेकायदा बिगर परवाना यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैधरीत्या वाळू उत्खनन करीत असताना मिळून आलेला आहे.त्याचे जवळ फायबर आणि शेक्शन बोट असे एकूण 12,00,000/-रू किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला असून, तो पोलीस स्टेशनला वाहून आणणे शक्य नसल्याने महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिलेटिनच्या साह्याने बोटीत स्फोट घडवून नाश करण्यात आलेली आहे.