शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कोऱ्हाळेमध्ये रोडरोमिओंवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:33 IST

६४ जण जाळ्यात : १६ हजार २०० रुपये दंड वसूल, पोलिसांच्या कामगिरीमुळे रोडरोमिओंच्या मनात धास्ती

वडगाव निंबाळकर / सुपे : शाळा- महाविद्यालयांच्या बाहेर वेगाने गाडीवर जाऊन मोठमोठ्याने हॉर्न वाजवणाऱ्या टवाळखोर रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी शनिवारी (दि. २५) वडगाव निंबाळकर पोलीस रस्त्यावर उतरले. पोलिसांनी हद्दीतील सोमेश्वरनगर ते कोºहाळे बुद्रुक परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्यासमोर नाकाबंदी करून वेगाने व बेशिस्त चालणाºया रोडरोमिओंवर धडक कारवाई करीत १६ हजार २०० रुपये दंड वसूल केला.

शाळा, कॉलेजमध्ये येणाºया मुलींना, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारी तरुणींची, महिलांची छेडछाड, रोडरोमिओंचा होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार सर्रास चालतात. त्यातच शाळा-कॉलेजच्या बाहेरून गाडीवर वेगाने जाणे, शाळा-कॉलेजच्या प्रवेशद्वारावर तासन्तास दुचाकी उभी करुन त्यावर गप्पा मारत बसणे, प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींची छेड काढणे, जोरजोराने हॉर्न वाजवणे, याचा त्रासही आता कॉलेजच्या आवारात वाढला आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, प्रवेशद्वारावर बसलेल्या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक आले, तर हे टवाळखोर दुचाकी घेऊन वेगाने निघून जात होते. त्यामुळेच दुचाकीवर फिरणाºया या टवाळखोरांवर कारवाई करण्यासही मयार्दा येत होत्या. परंतु शनिवारी मात्र सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोमेश्वरनगर ते कोºहाळे बुद्रुक परिसरात रस्त्यांवर नाकाबंदी करून कारवाई केली. बºयाच वेळा कॅम्पसच्या आवारामध्येही बंदी असताना दुचाकी वाहने घेऊन काही जण फिरतात. शनिवारी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे आता या प्रकाराला आळा बसणार आहे. शालेय विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांनींनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असले, तरी यामध्ये सातत्य ठेवण्याची गरज असल्याच्या भावानाही यावेळी व्यक्त केल्या. २ रोडरोमिओंवरील कारवाईत सातत्य राखले जाणार असून, यापुढे सातत्याने शाळा- महाविद्यालय भरणाच्या सुटण्याच्या कालावधीत ही कारवाई सुरूच ठेवली जाईल. तसेच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या तपासणीची मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणारे, ट्रिपलसीट फिरणारे, लायसन्स नसणारे, विना नंबरच्या गाड्या घेऊन फिरणारे, जोरजोराने हॉर्न वाजवणारे अशा बेशिस्त वाहनचालकांच्या गाड्या पकडून ६४ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १६ हजार २०० रुपये दंड वसूल केला. शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश नसलेल्या किंवा आयकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश न करण्याच्या सूचनाही दिल्या. या प्रकारामुळे रोडरोमिओंनी पोलिसांची धास्ती घेतली आहे.

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच टवाळखोर विद्यार्थ्यांकडून वाहने आडवी लावली जातात. याबाबत शाळा प्रशासन, सुरक्षारक्षकांनी जाब विचारल्यास त्यांना दमबाजी करण्यात येते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस