जागेचा ताबा घेण्यावरून हाणामारी

By Admin | Updated: May 9, 2017 04:00 IST2017-05-09T04:00:05+5:302017-05-09T04:00:05+5:30

पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील पानमळा परिसरात असणाऱ्या एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी आलेला जमाव

Action on possession of land | जागेचा ताबा घेण्यावरून हाणामारी

जागेचा ताबा घेण्यावरून हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील पानमळा परिसरात असणाऱ्या एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी आलेला जमाव आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये हाणामारी आणि बाचाबाची झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. एका खासगी व्यावसायिकाने जमाव जमवून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याने वाघोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांत मात्र कोणतीही फिर्याद दाखल नाही.
या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथे दुपारी पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या खासगी जमिनीचा ताबा जमाव गोळा करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी स्थानिक नागरिक व गुंडांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या वेळी हाणामारीचे प्रकारही झाले होते. यादरम्यान महामार्गाची वाहतूक ठप्प होऊन मोठी गर्दी झाली होती. ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाने स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश पाहून काढता पाय घेतला. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या प्रकारामुळे वाघोलीत दिवसभर भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकाराबाबत पोलिसांना कळवूनही पोलीस उशिरा पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी कोणतीही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही.
पुणे-महामार्गालगत खासगी लोकांकडून जमिनीचा ताबा घेण्यासाठी भरदुपारी झालेली दादागिरी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सहन करावी लागली. यावर पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Action on possession of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.