हेल्मेट न घातलेल्या पोलिसांवर कारवाई
By Admin | Updated: January 23, 2017 03:15 IST2017-01-23T03:15:04+5:302017-01-23T03:15:04+5:30
नागरिकांचे प्रबोधन करताना वाहतूक पोलिसांनीही स्वयंशिस्त अंगीकारावी. दुचाकी चालवताना पोलिसांनी स्वत:च हेल्मेट न घातल्यास

हेल्मेट न घातलेल्या पोलिसांवर कारवाई
वारजे : नागरिकांचे प्रबोधन करताना वाहतूक पोलिसांनीही स्वयंशिस्त अंगीकारावी. दुचाकी चालवताना पोलिसांनी स्वत:च हेल्मेट न घातल्यास व तसा फोटो मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करणारच. याबाबत हायगय करणार नाही, असे मत वाहतूक पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी व्यक्त केले.
कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत वारजे वाहतूक विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक अनिल पंतोजी, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एन.डी. पाटील, मुख्याध्यापक माधुरी खांबोटे, वारजे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पो. नि. म्हसवडे विलास तोडकर, प्रो. मीनल कमलाकर, नम्रता करंदीकर, विजयकुमार दुग्गल, हेल्मेटविषयीचे मार्गदर्शक कल्याण राजन व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
बारवकर पुढे म्हणाल्या, येथील मुलींना स्कार्फ चालतो, पण हेल्मेट घालावेसे वाटत नाही. नागरिकांनी स्वत:हून वाहतूक नियमांचे पालन केल्यास पोलिसांचा भार कमी होईल.
कार्यक्रमाच्या शेवटी वाहतूक सुरक्षेबाबत शपथ देण्यात आली.