शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मास्क, सॅनिटायझर महाग विकल्यास कारवाई; पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये तपासणी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 20:47 IST

एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

ठळक मुद्देवैधमापन विभागाचे नागरिकांना आवाहनएमआरपीपेक्षा अधिक पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

पुणे : सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून, पुणे शहरासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉशची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी अनेक ठिकाणी यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असून, नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. याबाबत पुणे विभागाच्या वैधमापन विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये खास तपासणी मोहीम सुरू केली असून, एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात काही तक्रारी असतील तर नागरिकांनी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे. याबाबत वैधमापनशास्त्र विभागाच्या कोरोना विशेष तपासणी पथकाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात सध्या कोरोनाचा संसर्गजन्य आजार फैलावत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश आदी वस्तूंच्या किमतीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली आहे. एमआरपीपेक्षा अधिक रक्कम घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे या कायद्याचा भंग करणाºयांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असेदेखील वैधमापनशास्त्र विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.-----------------------अधिकचे पैसे घेतल्यास येथे संपर्क करा- उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, पुणे विभाग : ०२०- २६६८३१७३/२६६९७२३२- सहायक नियंत्रक, पुणे जिल्हा : ०२०-२६१३७११४- सहायक नियंत्रक, सातारा जिल्हा : ०२१६२-२३२१४३- सहायक नियंत्रक, सांगली जिल्हा : ०२३३-२६०००५३- सहायक नियंत्रक, कोल्हापूर जिल्हा : ०२३१-२५४२५४९- सहायक नियंत्रक, सोलापूर जिल्हा : ०२१७-२६०१९४९०००

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीय