डिंभे येथे अवैध दारूधंद्यावर कारवाई

By Admin | Updated: January 10, 2017 02:41 IST2017-01-10T02:41:10+5:302017-01-10T02:41:10+5:30

डिंभे लेबर कॉलनी येथे घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री धंद्यावर धाड टाकून १४३ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

Action on illegal liquor at the dill | डिंभे येथे अवैध दारूधंद्यावर कारवाई

डिंभे येथे अवैध दारूधंद्यावर कारवाई

घोडेगाव : डिंभे लेबर कॉलनी येथे घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री धंद्यावर धाड टाकून १४३ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई फौजदार किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.
या प्रकरणी खैरूनीला बाबू शेख ही ५६ वर्षांची महिला व बाळू भुराजी हिलम या ५० वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. किरण भालेकर यांना मिळालेल्या खबरीवरून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ७१५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये किरण भालेकर यांच्यासह सहायक पोलीस फौजदार वाय. एस. भोजने, एस. एन. कायगुडे, आर. डी. तांबे, आर. एस. भोगाडे, एस. बी. निंबाळकर, श्रीमती आर. एम. बोठे सहभागी झाले होते.

Web Title: Action on illegal liquor at the dill