कोथरूडमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई
By Admin | Updated: January 24, 2017 02:30 IST2017-01-24T02:30:59+5:302017-01-24T02:30:59+5:30
पोलिसांनी कोथरूड परिसरात चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकत विविध फ्लेवर्स तसेच मद्याचा २७ हजार रुपयांचा साठा जप्त

कोथरूडमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई
पुणे : पोलिसांनी कोथरूड परिसरात चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकत विविध फ्लेवर्स तसेच मद्याचा २७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हॉटेल मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
रवींद्र दत्तू शिळीमकर (वय २८, रा. नवनाथ मित्रमंडळ, कोथरूड), महावीर सेवक गायकवाड (वय २४), हसन रहीदुल शेख (वय १९), दीपक प्रेस एसपी (वय १९), अरोन हॉरी देपकोटा (वय २३) व भीमकुमार रतन केसी (वय २१, सर्व रा. लाविदा हॉटेल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस नाईक सचिन इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. कोथरूड भागातील रमणबाग कॉलनीमध्ये असलेल्या तुळजाभवानी माता मंदिर टेकडीवर लाविदा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालवले जात असून, बेकायदा मद्यविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांच्या सूचनांनुसार, परिमंडल दोनमधील पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकत कारवाई केली. हे हॉटेल चौधरी नावाच्या व्यक्तीचे असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.