भाडेकरूंची माहिती न दिल्यास घरमालकांवर कारवाई
By Admin | Updated: July 1, 2015 23:41 IST2015-07-01T23:41:14+5:302015-07-01T23:41:14+5:30
जिल्ह्यातील घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना सर्व भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असून अशी माहिती

भाडेकरूंची माहिती न दिल्यास घरमालकांवर कारवाई
लोणी काळभोर : जिल्ह्यातील घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना सर्व भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असून अशी माहिती न दिल्यास संबंधित घरमालकावर दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती आहेत. तेथे काम करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ उकल होण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात असणे आवश्यक आहे.
हवेली, लोणी काळभोर, लोणी कंद, चाकण, खेड, शिक्रापूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, राजगड, पौड , लोणावळा ग्रामीण,शिरूर, रांजणगाव, व ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.
वेगवेगळ्या दहशतवादी व नक्षलवादी कारवाया मुळे आत्तापर्यत पुण्यातील १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच दि. ९ मे २0१५ रोजी तळेगाव दाभाडे येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या माओवादी संघटनेच्या २ सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
घरे, दुकाने, फ्लॅट भाड्याने देताना, पोटभाडेकरू ठेवताना, विक्री करताना मालमत्ता विकत घेणाऱ्याची, भाडेकरूची माहिती सात दिवसांत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया किंवा गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल. (वार्ताहर)