शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार चुक करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई : विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 18:05 IST

प्राध्यापकांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे...

ठळक मुद्देसुधारित नियमावली सोमवारी होणार प्रसिध्द 

पुणे : विद्यार्थ्यांचे विविध अंतर्गत परीक्षांचे गुण ऑनलाईन पध्दतीने भरताना प्राध्यापकांकडून चुका होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून महाविद्यालयावर कारवाई केली जात होती. परंतु, आता वारंवार चूक करणाऱ्या संबंधित प्राध्यापकावरचविद्यापीठाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गुण भरताना प्राध्यापकांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांचे गुण नियोजित कालवधीत भरून द्यावे लागतात. मात्र, अनेक प्राध्यापकांकडून वेळेत गुण भरून दिले जात नाहीत. तर काही प्राध्यापकांकडून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर चुकीचे गुण भरले जातात. त्यामुळे विद्यापीठाकडून संबंधित प्राध्यापक काम करत असलेल्या महाविद्यालयावर कारवाई केली जात होती. विद्यापीठाने याबाबत कडक नियमावली तयार केली होती. परंतु, अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार कडक नियमावलीवर पुनर्विचार करण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.या समितीने विद्यापीठाला नुकताच अहवाल सादर केला असून कडक नियमावलीत सुधारणा करत त्यात शिथिलता आणली आहे.अरविंद शाळिग्राम म्हणाले, दहा पेक्षा कमी चुका झाल्यास प्राध्यापकांकडून नजर चुकीचे ही चुक झाली असे गृहित धरले जाईल. मात्र, त्यापेक्षा जास्त चुका झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित प्राध्यापकाने तीन वेळा चुक केल्यानंतर जुन्या नियमावलीनुसार कारवाई होईल. चुका करणाऱ्या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या प्रमाद समिती समोर उभे रहावे लागेल.एका प्राध्यापकाने केलेल्या चुकीची शिक्षा पूर्ण महाविद्यालयाला का? अशी चर्चा केली जात होती. त्यामुळे आता संबंधित प्राध्यापकाला कारवाईला सामोरे जावे लागेल.येत्या सोमवारी (दि.७) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित नियमावली प्रसिध्द केली जाईल.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठProfessorप्राध्यापक