शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बारामतीत अतिक्रमणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 11:48 PM

२२ बेकायदा कत्तलखाने हटविले : तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बारामती : नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी राबविलेल्या मोहिमेत गावडे चौकात एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन करवाईला विरोध केला. मात्र, वेळीच नगरपालिकेच्या अधिकाºयांनी हस्तक्षेप करून या तरुणाला रोखल्याने अनर्थ टळला.

बारामती शहरात शुक्रवारपासून (दि. १४) अतिक्रमण विभागाने अतिक्रमाणे काढण्यास सुरुवात केली आहे. वारंवार दिलेल्या नोटिसांना व्यावसायिकांनी दाद न दिल्याने नगरपालिकेला कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शुक्रवारी म्हाडा कॉलनी परिसरातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करीत येथील २२ अतिक्रमणे नगरपालिकेने हटविली. यावेळी कत्तलखान्यांमधून निघणारे दुर्गंधीयुक्त घाण पाणी जमिनीमध्ये सिमेंट पाईप टाकून नदीपात्रामध्ये बेकायदा सोडल्याचे नगरपालिका प्रशासनास आढळून आले. नगरपालिकेने येथील सर्व अतिक्रमणे हटविली असून ही जागा उद्यानासाठी राखीव असल्याचे यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले. तसेच येथील नगरपालिकेच्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे. या जागेला लवकरच सात फुटी संरक्षक भिंत उभारली जाणार असल्याचेही नगरपालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, शनिवारी (दि. १५) शहरातील शिवाजी गावडे चौकात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला येथील एका तरुणाने विरोध केला. त्याच्या बाजूची सर्व अतिक्रमण केलेली दुकाने हटवा; अन्यथा अतिक्रमण काढू नका, अशी मागणी करीत प्रशांत सरतापे या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी वेळीच त्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेनंतर पोलीस संरक्षणदेखील मागवण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी सांगितले, की येथील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.अतिक्रमण केलेल्या सर्व व्यावसायिकांना याआधीच नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसमधील मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. मात्र, येथील दुकानदारांनी दुकानातील माल हलविण्यासाठी २४ तासांची मुदत यावेळी नगरपालिकेकडे मागितली आहे. त्यामुळे २४ तासांपर्यंत येथील कारवाई थांबवण्यात आली आहे. यावेळी शहर अभियंता आर. पी. शहा, राजेंद्र शिंदे, जमाल शेख, सागर भोसले, किरण साळवी, अनिल सरोदे, अजय देशमुख, अनेश मोरे यांनी या करावाईत सहभाग घेतला होता.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती