शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जुन्नरच्या माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 6:36 PM

उत्तम थोरात (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) यांनी भूमी अभिलेख मोजणी, तंटामुक्ती संदर्भात विविध चार अर्ज केले होते. मात्र, त्याची माहिती त्यांना मिळाली नाही.

ठळक मुद्देमाहिती आयुक्तांनी चार प्रकरणात २५ हजार रुपयांचा ठोठावला दंड

पुणे : अर्जदाराने माहिती अधिकारात केलेल्या विविध चार अर्जांवर माहिती न देणाऱ्या आणि माहिती आयोगाच्या सुनावणीस गैरहजर राहणाऱ्या जुन्नरच्या तत्कालिन नायब तहसिलदारांना माहिती आयुक्तांनी चार प्रकरणात २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आशा दुधे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.   उत्तम थोरात (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) यांनी भूमी अभिलेख मोजणी, तंटामुक्ती संदर्भात विविध चार अर्ज केले होते. मात्र, त्याची माहिती त्यांना मिळाली नाही. त्यासाठी माहिती आयोगाकडे व्दितीय अपील त्यांनी २०१५ साली दाखल केले होते. आयोगाने त्यांना या चारही प्रकरणांत नोटीस बजावली होती. मात्र, दुधे यांनी या प्रकरणी कोणताही लेखी खुलासा केला नाही. तसेच, आयोगाच्या सुनावणीस देखील त्या उपस्थित राहिल्या नाहीत. दुधे यांना खुलासा सादर करण्यात स्वारस्य नसून, माहिती अधिकार तरतुदींचे पालन करण्याचे गांभीर्य नसल्याचे ताशेरे पुणे खंडपीठाचे माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी ओढले आहे. एका प्रकरणात १० आणि उर्वरित तीन प्रकरणांत प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड  ठोठवण्यात आला आहे. त्यांच्या वेतनातून ही रक्कम वसुल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. थोरात यांनी जुन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीच्या हद्दीबाबत माहिती मागितली होती. एकाच कार्यालयाने त्यांच्या जमिनीच्या दोन वेगवेगळ्या हद्दी दाखविल्या होत्या. त्यामुळे त्याची माहिती मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, माहिती प्रश्नार्थक स्वरुपाची असल्याचे कारण देत दोन महिन्यांनी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. संबंधित माहिती अधिकाऱ्याने ३० दिवसांच्या मुदतीत उत्तर दिले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालिन भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक एस. डी. गवारी यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

टॅग्स :Junnarजुन्नरcollectorतहसीलदार