नियम तोडणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: June 10, 2017 02:16 IST2017-06-10T02:16:15+5:302017-06-10T02:16:15+5:30
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे.

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वानवडी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे.
या विशेष कारवाई मोहिमेनुसार आज नं. ४ परिमंडळमधून फातिमानगर चौक रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये चारचाकी वाहनांना असणाऱ्या काळ्या फिल्म काढून टाकण्यात येत होत्या. तसेच वाहनपरवाना नसणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे व वाहतुकीचे उल्लंघन करणे अशा वाहकांवर कारवाई करण्यात आली.