शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मावळात सरकारी आदेशाचे उल्लंघन करून फिरणार्‍या २८५ जणांवर पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:04 IST

मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे.

ठळक मुद्दे नियमांचे उल्लंघन करून फिरणार्‍य‍ांवर वचक बसविण्यासाठी मावळ तालुक्यात कारवाई

लोणावळा : शनिवार व रविवार या दोन दिवसात मावळ तालुक्यात शासनाच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून फिरणार्‍या तब्बल २८५ जणांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिली.     कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. असे असताना देखील नियमांचे उल्लंघन करून फिरणार्‍य‍ांवर वचक बसविण्यासाठी मावळ तालुक्यात लोणावळा शहर पोलिसांनी खालापुर टोलनाका, खंडाळा, वलवण, कुमार चौक, रायवुड व नौसेना बाग याठिकाणी, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका, कार्ला फाटा, मळवली, भाजे, पवनानगर, दुधिवरे खिंड याठिकाणी, कामशेत पोलीसांनी पवना चौक, भाजगाव व उंबरवाडी फाटा, वडगाव पोलिसांनी वडगाव तळेगाव फाटा व फळणे फाटा येथे तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली असताना देखील शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी मावळ तालुक्यात संचारबंदीचे उल्लंघन करून आलेल्या 285 जणांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये विना पास फिरणारे 90 जण, मास्क परिधान करून न फिरणारे 135 जण, चारचाकी वाहनांत तीन पेक्षा जास्त लोक व दुचाकी वाहनावर एक पेक्षा जास्त जण प्रवास करणारे अशा 60 जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यापुढे ही कारवाई आणखी कडक करण्याची सुचना सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे काँवत यांनी सांगितले.     जिल्हाधिकारी पुणे यांनी मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर प्रचलित कायद्याद्वारे कडक कारवाई केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे केवळ पोलिसांचे कर्तव्य नसून नागरिकांची देखील जबाबदारी आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करत स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याचे रक्षण करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसtourismपर्यटन