मांडवगण फराटा: पोलिसांना गावाच्या हद्दीत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चार मोटरसायकल, चार मोबाईल हॅन्डसेट रोख रक्कम असा एकूण २ लाख ६१ हजार १९० रु. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी देवराम श्रीपती इथापे (वय ६७ वर्षे), प्रकाश पितांबर भालेराव (वय २४ वर्षे), सुनिल हिरामन राठोड (वय २३ वर्षे), दशस्थ वाल्मिक शेलार (वय ६० वर्षे), रवि फुलसिंग चव्हाण (वय ३७ वर्षे), दादा दशरथ मोहोळकर (वय ४१ वर्षे), महादेव शंकर भोईटे (वय ३० वर्षे), लक्ष्मण निवृत्ती शेळके ( ( वय ५८ वर्षे) सर्व (रा.मांडवगण फराटा तालुका शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावच्या हददीत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. त्यांनी अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी ७ ते ८ लोक एका खोलीमध्ये हातामध्ये पत्ते घेऊन गोलकरून जुगार खेळताना दिसून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे सहाय्यक फौजदार साबळे गुन्हयाचा पुढील अधिक तपास करत आहेत.