दर्शन हळंदे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:40+5:302021-06-09T04:12:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दर्शन हळंदे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने ...

Action against Darshan Halande gang | दर्शन हळंदे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

दर्शन हळंदे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दर्शन हळंदे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.

दर्शन युवराज हळंदे (वय २१, रा. राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि रोहन ऊर्फ मोन्या बाळू सातपुते (वय १८, रा. शिवशंभोनगर, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

हळंदे याने साथीदारांसह टोळी तयार केली. १५ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्याने मॉन्टी कालेकर याच्यावर तलवारीने हल्ला केला. इतर ३ ते ४ जणांनी हातामध्ये बाटल्या व दगड घेऊन मॉन्टी कालेकर याला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एकाने आकाश खोपडे याच्या दिशेने बाटली फेकून मारली. ती आकाश याच्या डोक्याला लागून तो जखमी झाला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

हळंदे टोळीच्या माध्यमातून हल्ला, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून दहशत पसरवित आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मान्यता दिली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे हे अधिक तपास करीत आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात मोक्कांतर्गत केलेली ही ३२ वी कारवाई असून या वर्षातील ही २७ वी कारवाई आहे.

Web Title: Action against Darshan Halande gang